पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातील भोपाळ इथे संयुक्त कमांडर्स परिषदेत सहभागी झाले.

‘सज्ज, पुनरुत्थानक्षम आणि संबंधित’ ही सैन्य दलातील कमांडर्सच्या तीन दिवसीय परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य दलांतील समन्वय आणि प्रत्येक दल प्रमुखाच्या अधिकारात लष्कर, नौदल आणि वायूदलाच्या तुकड्यांचा समावेश या विषयांशी संबंधित बाबींवर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने जाण्यासाठी सैन्य दलांची तयारी आणि प्रगतीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला.

तिन्ही सैन्य दलांचे कमांडर्स आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. तिन्ही दलांच्या जवानांसाठी समावेशक, अनौपचारिक सत्रांचेही परिषदेत आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये या जवानांचा सक्रीय सहभाग होता.

पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात सांगितले, “आज भोपाळमध्ये संयुक्त कमांडर्स परिषदेत भाग घेतला. भारताच्या सुरक्षाविषयक उपकरणांमध्ये कशा प्रकारे वाढ करता येईल यावर आम्ही व्यापक चर्चा केली.”

 

More details at https://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1912891

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'

Media Coverage

'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 सप्टेंबर 2026
September 15, 2026

A Mandate of Performance: Civic Wins, IPO Surge and Neighbourly Power Reflect Faith in PM Modi’s Leadership