पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करुन या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण प्रसंगी भारत संयुक्त अरब अमिरातीच्या पाठीशी एकजुटीने उभा असल्याचे त्यांनी सांगितले.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये रहात असलेल्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचे आभार मानले. या क्षेत्रात प्रादेशिक शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य प्रस्थापित करुन तणाव कमी करण्यासाठी भारताचा निरंतर पाठिंबा असेल यावर पंतप्रधानांनी भर दिला.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
"संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष, माझे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला तसेच या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण प्रसंगी भारत संयुक्त अरब अमिरातीच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये रहात असलेल्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आम्ही तणाव कमी करणे, प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याला पाठिंबा देतो."
Spoke with President of the UAE, my brother Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan. Strongly condemned the attacks on the UAE and condoled the loss of lives in these attacks. India stands in solidarity with the UAE in these difficult times.
— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2026
Thanked him for taking care of the Indian…


