दोन्ही नेत्यांमधे भारत-युक्रेन भागीदारी अधिक दृढ करण्याविषयीच्या मार्गांवर चर्चा
भारताच्या लोक-केंद्री दृष्टिकोनाचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार; संघर्ष टाळण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरी वापरण्याचा दिला सल्ला
कोणत्याही शांततामय तोडग्याला समर्थन देण्यासाठी भारताला जे जे शक्य असेल, ते करत राहू- पंतप्रधानांनी केले अधोरेखित
युक्रेनच्या नागरिकांना भारताकडून सातत्याने मिळत असलेल्या मानवतावादी सहाय्याबद्दल राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताची केली प्रशंसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी, विविध क्षेत्रात, भारत-युक्रेन भागीदारी अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.

तसेच,रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षावर चर्चा करतांना, पंतप्रधानांनी भारताच्या लोक-केंद्री दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा वापर करण्याचा सल्ला दिला.

दोन्ही देशांमधील सर्व मुद्यांवर लवकरात लवकर आणि शांततामय तोडगा काढण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा संपूर्ण पाठिंबा राहील, असे त्यांनी अधोरेखित केले. या समस्येवर शांततामय तोडगा काढण्यासाठी, भारताला जे जे करणे शक्य आहे, ते सगळे आम्ही करत राहू, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

युक्रेनच्या नागरिकांना भारताकडून सातत्याने मिळत असलेल्या मानवतावादी सहाय्याबद्दल राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताची प्रशंसा केली.

दोन्ही नेत्यांमधे परस्पर संपर्कात राहण्याबद्दल सहमती झाली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Technical textiles critical to footwear sector

Media Coverage

Technical textiles critical to footwear sector
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 एप्रिल 2026
April 29, 2026

Leadership That Plays, Builds & Delivers: PM Modi’s Vision Igniting Youth, Women & Northeast India