पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

या संभाषणादरम्यान, पंतप्रधानांनी भारत, कुवेतचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या उल्लंघनाचा निषेध करत असल्याचे स्पष्ट केले आणि या कठीण काळात भारत कुवेतच्या जनतेसोबत असल्याचे सांगितले.

दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य  पुनर्स्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचे महत्त्व अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी कुवेतमधील भारतीय समुदायाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कुवेती नेतृत्वाकडून मिळत असलेल्या निरंतर पाठिंब्याची प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;

"कुवेतचे युवराज महामहीम शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी फलदायी दूरध्वनी चर्चा झाली. कुवेतचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या उल्लंघनांचा भारत निषेध करतो आणि या कठीण काळात त्यांच्या जनतेसोबत उभा आहे. 

प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचे महत्त्व आम्ही अधोरेखित केले. कुवेतमधील भारतीय समुदायाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कुवेती नेतृत्वाच्या निरंतर पाठिंब्याची प्रशंसा केली.”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
A Milestone in Financial Inclusion: The Success Story of PMSBY

Media Coverage

A Milestone in Financial Inclusion: The Success Story of PMSBY
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 मे 2026
May 09, 2026

Citizens Celebrate India’s Civilisational & Economic Awakening Under PM Narendra Modi