पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर माननीय शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
भारत कतारसोबत ठामपणे उभा आहे आणि कतारच्या सार्वभौमत्व तसेच प्रादेशिक अखंडत्वाच्या कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाचा भारत तीव्र निषेध करतो, अशी भावना पंतप्रधानांनी या संभाषणादरम्यान व्यक्त केली.
संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या तातडीच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी या आव्हानात्मक काळात कतारमधील भारतीय समुदायाला कतारच्या नेतृत्वाकडून मिळत असलेले सातत्यपूर्ण सहकार्य आणि त्यांची काळजी घेतली जात असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पंतप्रधानांनी 'X' या समाज माध्यमावर लिहिले आहे की:
“माझे बंधू, कतारचे अमीर माननीय शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी संवाद साधला. आम्ही कतारसोबत ठामपणे उभे आहोत आणि कतारच्या सार्वभौमत्वाचे तसेच प्रादेशिक अखंडत्वाच्या होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाचा तीव्र निषेध करतो. संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या गरजेवर आम्ही भर दिला. या आव्हानात्मक काळात कतारमधील भारतीय समुदायाची सतत काळजी घेतल्याबद्दल आणि त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
@TamimBinHamad”
Spoke with my brother, H.H. Sheikh Tamim bin Hamad Al Thani, the Amir of Qatar. We stand firmly in solidarity with Qatar and strongly condemn any violation of its sovereignty and territorial integrity. We emphasized the urgent need to restore peace and stability in the region…
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2026
تحدثتُ مع أخي، صاحب السمو الشيخ تميم بن حمد آل ثاني، أمير دولة قطر. نقف صفاً واحداً متضامنين مع قطر، وندين بشدة أي انتهاك لسيادتها ووحدة أراضيها. شددنا على الحاجة المُلحة لاستعادة السلام والاستقرار في المنطقة عبر الحوار والدبلوماسية. كما أعربتُ عن تقديري لدعمه المتواصل واهتمامه…
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2026


