पंतप्रधानांनी भारत आणि अरब जगतातील नागरिकांमधील दृढ आणि ऐतिहासिक संबंध अधोरेखित केले
व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि इतर क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार
पॅलेस्टाईनच्या जनतेला भारताचा सतत पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार करून गाझा शांतता योजनेसह सुरू असलेल्या शांतता प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून स्वागत .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज अरब देशांचे परराष्ट्र मंत्री, लीग ऑफ अरब स्टेट्सचे सरचिटणीस आणि अरब प्रतिनिधीमंडळांच्या प्रमुखांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. ते भारत-अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या दुसऱ्या बैठकीसाठी भारतात आले आहेत.

पंतप्रधानांनी भारत आणि अरब जगतामधील नागरिकांमध्ये असलेल्या दृढ आणि ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला. हे संबंध वर्षानुवर्षे दोन्ही देशांमधील संबंधांना प्रेरणा देत आहेत आणि मजबूत करत आहेत.

पंतप्रधानांनी आगामी काळातील भारत-अरब भागीदारीसाठीचा आपला दृष्टीकोन स्पष्ट केला आणि परस्परांच्या नागरिकांच्या फायद्यासाठी व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि इतर प्राधान्य क्षेत्रांमधील सहकार्य आणखी दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनच्या जनतेला भारताचा कायम पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आणि गाझा शांतता योजनेसह सध्या सुरू असलेल्या शांतता प्रयत्नांचे स्वागत केले. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी अरब लीगने बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Rameswaram temple in backdrop as Modi welcomes leaders

Media Coverage

Rameswaram temple in backdrop as Modi welcomes leaders
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates Indian Women’s Cricket Team on winning Asia Cup
September 14, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, has congratulated the Indian Women’s Cricket Team on winning the Asia Cup.

The Prime Minister said that the team’s confidence, consistency and remarkable spirit were on full display throughout the tournament.

Shri Modi expressed hope that this triumph would inspire millions of youngsters across the country to play more and shine.

In a post on X, Shri Modi said;

“A proud moment for Indian cricket!

Congratulations to the Women’s team on winning the Asia Cup. Their confidence, consistency and remarkable spirit were on full display throughout the tournament.

May this triumph inspire millions of youngsters across the country to play more and shine.”