पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकरजींच्या जीवनातील शिकवणीवर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

वीर सावरकरजी हे भारतमातेचे कर्तव्यकठोर आणि समर्पित पुत्र असून प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या संकल्पावर दृढ राहण्याची शिकवण आपल्याला त्यांच्या जीवनातून मिळते. सावरकरजी यांच्या जीवनातून  प्रतिबिंबित होणारी धैर्य, संयम आणि मातृभूमीप्रती समर्पणाची भावना नेहमीच देशवासीयांच्या मार्गदर्शन करत राहील, असे ही पंतप्रधानांनी पुढे म्हटले आहे,

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे;

भारतमातेचे कर्तव्यकठोर सुपुत्र वीर सावरकर यांचे जीवन आपल्याला प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या संकल्पावर दृढ राहण्याची शिकवण देते. त्यांचे धैर्य, संयम आणि मातृभूमीप्रती समर्पणाची भावना आपल्या देशवासियांना सदैव मार्गदर्शन करेल.

धीराः शोकं तरिष्यन्ति लभन्ते सिद्धिमुत्तमाम्।
धीरैः सम्प्राप्यते लक्ष्मीर्धैर्यं सर्वत्र साधनम्॥

"धैर्यशाली  आणि दृढनिश्चयी व्यक्ती दुःखावर मात करून त्यांच्या जीवनात यश मिळविण्यास सक्षम असतात. अशा व्यक्ती सधन आणि समृद्धही  बनतात. म्हणूनच, संयम आणि धैर्य हे नेहमीच जीवनात यश मिळविण्याचे सर्वोत्तम साधन आहे."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Auckland's Sky Tower lights up in India's tricolour as PM Modi begins historic New Zealand visit

Media Coverage

Auckland's Sky Tower lights up in India's tricolour as PM Modi begins historic New Zealand visit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 जुलै 2026
July 11, 2026

Record Exports, Record Investments, Record Pride: India’s Rise Under PM Modi is Multi-Dimensional