नम्रता, क्षमाशीलता आणि उत्तम आचरण हेच व्यक्तिमत्त्वाचे खरे अलंकार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याच गुणांच्या बळावर देशवासीय विकसित भारत साकारण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने अविरतपणे कार्यरत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे-
“तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत।। ”
तेज, क्षमाशीलता, अढळ धैर्य, शुद्ध आचरण, राष्ट्राप्रती निस्सीम निष्ठा आणि अहंकारापासून मुक्त असे विनम्र व्यक्तिमत्त्व—हे सर्व गुण ईश्वरी गुणांनी संपन्न असलेल्या व्यक्तीची लक्षणे मानले जातात.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
नम्रता, क्षमाशीलता आणि उत्तम आचरण हेच व्यक्तिमत्त्वाचे खरे अलंकार आहेत. याच गुणांच्या बळावर देशवासी विकसित भारत साकारण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने अविरतपणे कार्यरत आहेत.
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत।।”
विनम्रता, क्षमाशीलता और उत्तम आचरण ही व्यक्तित्व के सच्चे आभूषण हैं। इन गुणों के साथ ही आज देशवासी विकसित भारत के संकल्प की सिद्धि में निरंतर जुटे हैं।
— Narendra Modi (@narendramodi) May 29, 2026
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत।। pic.twitter.com/5JuC5ITZAu


