पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेवर भर देणारे एक संस्कृत सुभाषित समाज माध्यमावर सामायिक केले आहे:
नाम्भोधिरर्थितामेति सदाम्भोभिश्च पूर्यते ।
आत्मा तु पात्रतां नेयः पात्रमायान्ति सम्पदः॥
समुद्र कधीही पाण्याची मागणी करत नाही, तरीही तो नेहमी पाण्याने भरलेला असतो. त्याचप्रमाणे, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला पात्र किंवा सक्षम बनवते, तेव्हा संपत्ती स्वतःहून त्या व्यक्तीकडे चालून येथे असा या सुभाषिताचा अर्थ असा आहे.
आत्मनिर्भरता हा स्वाभिमान आणि सामर्थ्याचा मार्ग दाखवणारा दिवा आसून, त्याचप्रमाणे यावेळचा अर्थसंकल्प देखील आपल्या युवा सहकाऱ्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
आत्मनिर्भरता हा असा दिवा आहे, जो स्वाभिमान आणि सामर्थ्याचा मार्ग दाखवतो. यावेळचा अर्थसंकल्प देखील आपल्या युवा सहकार्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणारा आहे.
नाम्भोधिरर्थितामेति सदाम्भोभिश्च पूर्यते ।
आत्मा तु पात्रतां नेयः पात्रमायान्ति सम्पदः॥"
आत्मनिर्भरता वह दीपक है, जो आत्मसम्मान और सामर्थ्य का मार्ग दिखाता है। इस बार का बजट भी हमारे युवा साथियों को आत्मनिर्भर और सशक्त बनाने में अहम भूमिका निभाने वाला है।
— Narendra Modi (@narendramodi) February 2, 2026
नाम्भोधिरर्थितामेति सदाम्भोभिश्च पूर्यते ।
आत्मा तु पात्रतां नेयः पात्रमायान्ति सम्पदः॥ pic.twitter.com/x7iSHqop57


