पंतप्रधान,नरेंद्र मोदी यांनी एन.सुब्बुलक्ष्मी यांचे एक हृदयस्पर्शी पत्र शेअर केले आहे. या पत्रात, सुब्बुलक्ष्मी यांनी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. प्रसार भारतीचे माजी बोर्ड सदस्य सी.आर.केसवन यांची, नवी दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी आपण भेट घेतल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. केसवन यांनी एन. सुब्बुलक्ष्मी यांचे पत्र पंतप्रधानांना दाखवले. सुब्बुलक्ष्मी या मदुराई इथल्या असून, त्या सी. आर. केसवन यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या घराचे फोटो सामाईक केले असून, कृतज्ञता व्यक्त करत आशीर्वाद दिले आहेत.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

“आज मी @crkesavan यांना भेटलो.त्यांनी एन.सुब्बुलक्ष्मी जी,ज्या त्यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करतात, त्यांचे एक अतिशय हृदयस्पर्शी पत्र शेअर केले आहे.मदुराई इथल्या एन. सुब्बुलक्ष्मीजी यांना आर्थिक समस्यांसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांनी पीएम आवास योजने अंतर्गत घरासाठी यशस्वीपणे अर्ज केला.”

“त्यांच्या पत्रात एन. सुब्बुलक्ष्मी जी यांनी हे देखील सांगितले की हे त्यांचे पहिलेच घर आहे,आणि त्याने त्यांच्या जीवनात आदर आणि प्रतिष्ठा देखील आणली आहे.त्यांनी आपल्या घराची छायाचित्रे शेअर केली आहेत, आणि कृतज्ञता व्यक्त करत आशीर्वाद दिले आहेत. हे असे आशीर्वाद आहेत, जे शक्तीचा मोठा स्रोत आहेत.”

“एन.सुब्बुलक्ष्मीजीं प्रमाणेच असे असंख्य लोक आहेत,ज्यांचे जीवन पीएम आवास योजनेमुळे बदलले आहे.घरामुळे त्यांच्या जीवनात गुणात्मक फरक पडला आहे.ही योजना  महिला सक्षमीकरणामधेही आघाडीवर आहे.”

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Parliament passes Jan Vishwas Bill 2026, decriminalising 717 offences, fines up to Rs 1 crore

Media Coverage

Parliament passes Jan Vishwas Bill 2026, decriminalising 717 offences, fines up to Rs 1 crore
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 एप्रिल 2026
April 03, 2026

India’s Sweet, Fast & High-Tech Revolution: FY26 Milestones That Signal Viksit Bharat Has Arrived