पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या शाश्वत संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाला आदरांजली वाहिली आणि शतकानुशतके झालेल्या असंख्य आक्रमणांनंतरही टिकून राहिलेल्या भारताच्या लवचिकतेवर भर दिला. त्यांनी नमूद केले की भारताचा सभ्यतागत प्रवास देशातील जनतेच्या सामूहिक शक्तीमुळेच टिकून राहिला आहे. नागरिकांनी अखंड निष्ठा आणि अटळ समर्पणाने भारताच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण केले, असे त्यांनी अधोरेखित केले.
‘एक्स’ वर संस्कृतमधील सुभाषित शेअर करत त्यांनी सहनशीलता आणि लवचिकतेचा सखोल अर्थ व्यक्त केला:
“आपली महान संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरा अनेक शतकांमध्ये असंख्य हल्ल्यांची साक्षीदार राहिली आहे. देशवासियांची सामूहिक एकजूट आणि ताकदच अशी आहे, ज्यामुळे आपली सांस्कृतिक धरोहर कायम अभंग राहिली आहे.
वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम्।।”
हमारी महान संस्कृति और आध्यात्मिक विरासत अनगिनत हमलों की भी साक्षी रही है। यह देशवासियों की सामूहिक शक्ति ही है, जिसने हमारी सांस्कृतिक धरोहर को हमेशा अक्षुण्ण रखा है।
— Narendra Modi (@narendramodi) January 5, 2026
वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ।। pic.twitter.com/tOs3T2Zi2x


