सैन्यदलातील कालनिरपेक्ष धैर्य ,निष्ठा आणि अतूट कर्तव्यनिष्ठेची भावना यांना अभिवादन करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

भारतीय सैन्यदिनानिमित्ताने भारतीय सैन्याचे दुर्दम्य धैर्य आणि निरंतर कर्तव्यनिष्ठा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन:पूर्वक आदरांजली वाहिली आहे. 

अढळ समर्पणाच्या भावनेने राष्ट्राच्या सीमांचे आव्हानात्मक परिस्थितीत संरक्षण करणाऱ्या आणि निस्वार्थी सेवेचे उच्च आदर्श अंगिकारणाऱ्या  भारतीय सैन्यदलातील जवानांचा गौरव करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले आहे 

भारतीय सैन्याचे शौर्य आणि त्याग याबद्दल अनंतकाळापर्यंत राष्ट्राकडून कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधानांनी भारतीय सैन्यदलाला नमन केले आहे 

आपल्या विविध एक्स पोस्ट्स वरील मालिकांतून पंतप्रधान नमूद करतात: 

“भारतीय सैन्यदलाच्या धैर्य आणि निरंतर कर्तव्यनिष्ठेला सैन्य दिनानिमित्त आम्ही वंदन करत आहोत 

आपले जवान निस्वार्थी सेवेचे प्रतिक असून दृढ कर्तव्यनिष्ठेने अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीत देखील आपल्या देशाचे संरक्षण करतात.त्यांची कर्तव्य भावना संपूर्ण देशाला आत्मविश्वास आणि कृतज्ञतेच्या भावनेला प्रेरणा देते. 

कर्तव्य बजावताना जे धारातीर्थी पडले त्यांचेही आम्ही आदरपूर्वक स्मरण करत आहोत 

@adgpi”

“दुर्गम स्थलों से लेकर बर्फीली चोटियों तक हमारी सेना का शौर्य और पराक्रम हर देशवासी को गौरवान्वित करने वाला है। सरहद की सुरक्षा में डटे जवानों का हृदय से अभिनंदन!

अस्माकमिन्द्रः समृतेषु ध्वजेष्वस्माकं या इषवस्ता जयन्तु।

अस्माकं वीरा उत्तरे भवन्त्वस्माँ उ देवा अवता हवेषु॥”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'

Media Coverage

'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 सप्टेंबर 2026
September 15, 2026

A Mandate of Performance: Civic Wins, IPO Surge and Neighbourly Power Reflect Faith in PM Modi’s Leadership