योग ही भारताने मानवतेला दिलेली अमूल्य आणि कालातीत देणगी! मन, शरीर आणि आत्मा यांना एकत्र आणून, योग एक निरोगी आणि अधिक सुसंवादी जग निर्माण करण्यासाठी प्रेरित करतो: पंतप्रधान
अहमदाबाद हे युनेस्कोचे जागतिक वारसा शहर असून भारताच्या या ऐतिहासिक शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करणे ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे: पंतप्रधान
जागतिक योग दिनापूर्वी होत असलेल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेने आणला आहे आरोग्य आणि निरामयतेचा दुहेरी आनंद: पंतप्रधान
या अजिंक्यपद स्पर्धेच्या माध्यमातून योगासनांना एक स्पर्धात्मक खेळ म्हणून नवीन ओळख मिळेल आणि भविष्यात ऑलिम्पिक तसेच इतर बहुविध क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धांमध्ये योगासनांचा समावेश होईल, असा मला विश्वास आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ  संदेशाद्वारे अहमदाबाद येथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेमुळे जागतिक क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक मैलाचा दगड प्रस्थापित झाल्याचे मानले जात आहे. "आज अहमदाबादच्या भूमीवरून जगाच्या क्रीडा वारशामध्ये एक नवीन अध्याय जोडला जात आहे," असे  मोदी यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

या पहिल्यावहिल्या अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेण्यासाठी जगभरातून एकत्र आलेल्या खेळाडूंचे स्वागत करताना पंतप्रधानांनी या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे यजमानपद अहमदाबादला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. "अहमदाबाद हे युनेस्कोचे जागतिक वारसा शहर आहे आणि भारताच्या या ऐतिहासिक शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करणे ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे," असे  मोदी यांनी नमूद केले.

योगाशी संबंधित या महत्त्वपूर्ण जागतिक उपक्रमांच्या अपूर्व संगमोत्सवाचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार असून, यावर्षीचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम ऐतिहासिक कोलकाता शहरात आयोजित केला जाणार आहे. जागतिक योग दिनापूर्वी होत असलेल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेमुळे आरोग्य आणि निरामयतेचा दुहेरी आनंद लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.

योगाला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सुमारे दशकभरापूर्वी भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. प्राचीन भारतीय परंपरेतील योगाचा मानवतेच्या आरोग्य आणि सामूहिक कल्याणाशी संबंध जोडण्याचा या प्रस्तावामागील उद्देश होता. “या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांतील 190 देशांनी पाठिंबा दिल्याचेही” त्यांनी नमूद केले.

योगाचा जगभरात वाढता स्वीकार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगातील कोट्यवधी लोकांनी योग, ध्यान आणि प्राणायाम यांचा आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकार केला आहे. सजीव परंपरा काळानुरूप विकसित होत राहतात, यावर भर देत त्यांनी जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला योगाच्या आधुनिक आणि समकालीन रूपातील एका नव्या पर्वाची सुरुवात असे संबोधले.

योगासनाला एक मान्यताप्राप्त स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून प्रस्थापित करण्यामधील या विजेतेपदाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी भविष्यात प्रमुख जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये त्याचा समावेश होईल, असा विश्वास व्यक्त केला. "या चॅम्पियनशिपच्या अर्थात विजेतेपदाच्या  माध्यमातून योगासनाला एक स्पर्धात्मक खेळ म्हणून नवी ओळख मिळेल आणि मला खात्री आहे की,  भविष्यात योगासनाचा ऑलिम्पिक आणि इतर बहु-क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश केला जाईल," असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

अहमदाबादच्या अग्रणी भूमिकेची दखल घेत, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, ही उद्घाटन स्पर्धा योगासनाला मुख्य प्रवाहातील जागतिक क्रीडा मान्यता मिळवून देण्याच्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरेल. एक खेळ म्हणून योगासनाच्या वाढीचे व्यापक आर्थिक आणि व्यावसायिक परिणाम यावर जोर देत त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आणि व्यवसायांमध्ये निर्माण होणाऱ्या संधींची रूपरेषा मांडली. "जसजसा योगासन खेळाचा विस्तार होईल, तसतशा नवीन शक्यता निर्माण होतील. यामध्‍ये खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शास्त्रज्ञ, संशोधक आणि ‘इव्हेंट मॅनेजर’ यांच्यासाठी करिअरच्या संधी उपलब्ध होतील," असे मोदी म्हणाले.

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची 'निरोगी वार्धक्यासाठी योग' ही संकल्पना अधोरेखित करताना पंतप्रधानांनी समकालीन जागतिक आरोग्य समस्या आणि दीर्घायुष्याच्या शोधात असलेल्या आधुनिक लोकसंख्येसाठी योगाचे महत्त्व यावर भाष्य केले. "जे लोक दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय ठेवू शकणाऱ्या उपायांच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी योग हा एक अतिशय योग्य पर्याय आहे," असे मोदी म्हणाले.

एक मुक्ती देणारे साधन आणि एक परवडणारा आरोग्य उपाय असे योगासनाचे दुहेरी फायदे अधोरेखित करत मोदी यांनी त्याच्या सार्वत्रिक उपलब्धतेबद्दल एक समग्र संदेश दिला. योगासनाच्या प्रतिबंधात्मक शक्तीला जागतिक ओळख मिळावी यादृष्टीने त्यांनी एक अविस्मरणीय सार्वजनिक आरोग्य मंत्र सोप्या, संस्मरणीय शब्दांत मांडला. "दररोज योग करा, त्यामुळेच सर्व आजार दूर जातील," असे मोदी‌ यांनी स्पष्ट केले.

दैनंदिन जीवनात योगचा समावेश करण्याच्या आयुष मंत्रालयाच्या 'योग 365' मोहिमेच्या अलीकडील उपक्रमाची दखल घेत पंतप्रधानांनी या चळवळीत व्यापक जागतिक सहभागाचे आवाहन केले. सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मायदेशी परतल्यावर योगचे जागतिक राजदूत बनण्याचे आवाहन करताना पंतप्रधानांनी प्रभावशाली व्यक्ती आणि मतप्रवर्तक म्हणून त्यांच्या विशेष स्थानाची दखल घेतली. "ज्यावेळी  तुम्ही आपापल्या देशात परतणार, त्यावेळी  'योग 365' चे राजदूत म्हणून योगचा हा संदेश सोबत घेऊन जा आणि तुमच्या अनुभवातून तसेच श्रद्धेतून संपूर्ण जगाला या संदेशाशी जोडावे," असे मोदी म्हणाले.

स्पर्धेतील निकालांची पर्वा न करता, सर्व सहभागींना ऐतिहासिक योगदानकर्ते म्हणून गौरवत मोदी यांनी या उद्घाटन सोहळ्यातील त्यांच्या उपस्थितीचे सखोल महत्त्व अधोरेखित केले.

एकत्र जमलेल्या जागतिक दर्जाच्या ॲथलीटची प्रेरणादायी शक्ती ओळखून त्यांनी त्यांची सामूहिक प्रतिभा आणि शिस्त जगभरातील तरुणांसाठी एक मार्गदर्शक प्रकाशस्तंभ असल्याचे श्रेय बहाल केले. "तुमची वचनबद्धता जगभरातील तरुणांना प्रेरणा देईल," असे ते म्हणाले.

योगासनातील सर्वोत्कृष्‍ट विजेतेपदाच्या स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन करताना पंतप्रधान  मोदी यांनी घोषित केले, "मी याद्वारे पहिली जागतिक योगासन विजेतेपद स्पर्धा  2026, अहमदाबाद खुली झाल्याचे जाहीर करतो!”

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s power sector set for strong FY27 growth on rising demand, capacity additions: Report

Media Coverage

India’s power sector set for strong FY27 growth on rising demand, capacity additions: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam applauding the courage and perseverance of India's Youth
July 20, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam applauding the courage and perseverance of India's Youth:

"प्राप्यापदं न व्यथते कदाचिदुद्योगमन्विच्छति चाप्रमत्तः।

दुःखं च काले सहते महात्मा धुरन्धरस्तस्य जिताः सपत्नाः॥"

Shri Modi said that our youth is achieving historic success through their courage, self-confidence, and relentless hard work, and this is the greatest strength of a rapidly developing India.

The Prime Minister posted on X:

आज हमारे युवा साथी धैर्य, आत्मविश्वास और अथक परिश्रम से ऐतिहासिक सफलता हासिल कर रहे हैं। यही विकसित हो रहे भारत की सबसे बड़ी ताकत है।

प्राप्यापदं न व्यथते कदाचिदुद्योगमन्विच्छति चाप्रमत्तः।

दुःखं च काले सहते महात्मा धुरन्धरस्तस्य जिताः सपत्नाः॥