पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज एव्हियन येथे जी-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यासोबत एक द्विपक्षीय बैठक झाली.
जानेवारी 2026 मध्ये भारतात पार पडलेल्या 16 व्या ऐतिहासिक भारत-युरोपीय संघ शिखर परिषदेच्या आठवणींना उजाळा देत, नेत्यांनी तेव्हापासून भारत आणि युरोपीय संघाच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचे स्वागत केले. भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी नुकत्याच यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा उल्लेख नेत्यांनी एक 'ऐतिहासिक यश' असा केला आणि या करारावर स्वाक्षरी करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यावर भर दिला. यामुळे व्यापार आणि गुंतवणुकीच्या अफाट संधी खुल्या होतील, तसेच सध्याच्या अस्थिर भू-राजकीय परिस्थितीत पुरवठा साखळीच्या विविधीकरणाला हातभार लागेल, असे त्यांनी नमूद केले.

मुक्त बाजार अर्थव्यवस्था आणि बहुसंख्याक समाज असलेले जगातील दोन सर्वात मोठे लोकशाही देश म्हणून, भारत आणि युरोपीय संघामधील संबंध हे विश्वास, सामायिक मूल्ये आणि भविष्यासाठीच्या एकाच दृष्टिकोनावर आधारित आहेत. नेत्यांनी जानेवारी 2026 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या 'भारत-युरोपीय संघ संयुक्त सर्वसमावेशक धोरणात्मक कार्यक्रमा’ च्या प्रगतीवर चर्चा केली आणि ही भागीदारी भारत-युरोपीय संघ धोरणात्मक सहकार्याला अधिक बळकट करेल, तसेच या उपक्रमामुळे दोन्ही देशांना लाभ होईल आणि त्यांच्या विकासात तसेच परस्पर संबंधांमध्ये सकारात्मक आणि आमूलाग्र बदल घडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करताना नेत्यांनी पश्चिम आशियातील घडामोडींचे स्वागत केले. शांतता, स्थैर्य, समृद्धी आणि शाश्वत विकासासाठी योगदान देणारी एक लवचिक बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण करण्याप्रती त्यांनी आपल्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
It was wonderful meeting European Council President António Costa and European Commission President Ursula von der Leyen in Evian earlier today. At the start of this year, India was proud to host them for our Republic Day celebrations. This has been a great time for India-EU ties… pic.twitter.com/jwVVUHhYK4
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2026


