पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फर्स्ट सोलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क विडमर यांची भेट घेतली.

भारतातील नवीकरणीय उर्जेबाबतचे चित्र, विशेषतः सौरउर्जेची क्षमता आणि 2030 पर्यंत नवीकरणीय उर्जा स्रोतांपासून 450 GW वीज उत्पादनाचे लक्ष्य यावर त्यांची चर्चा झाली. स्वतःचे एकमात्र पातळ फिल्म तंत्रज्ञान वापरून भारताच्या नवीन उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या सहाय्याने भारतात उत्पादन सुविधा स्थापन करण्याचा फर्स्ट सोलरच्या उद्देशावरही चर्चा झाली. तसेच जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग यावरही चर्चा झाली.
Renewed focus on renewable energy.
— PMO India (@PMOIndia) September 23, 2021
CEO of @FirstSolar, Mr. Mark Widmar called on PM @narendramodi. PM Modi elaborated on India's efforts to harness solar energy, including the 'One world, One sun and One grid' initiative and investment opportunities in the sector. pic.twitter.com/tkPjoTkBwm