पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रत्येक बालिकेला सन्मान,  संधी  मिळावी आणि त्यांच्या जीवनात आशा निर्माण होऊन, त्याप्रमाणे जीवन जगता यावे यासाठी सरकारच्या अतूट  संकल्पाचा पुनरुच्चार केला.

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, गेल्या दहा वर्षांत बालिकांचे शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्यसेवेमध्ये सुधारणा करण्यावर निरंतर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यांनी नमूद केले की, या प्रयत्नांमुळे असे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे  बालिका प्रगती करू शकतात.

पंतप्रधानांनी 'एक्स' या समाज माध्‍यमावर लिहिले;

 “राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, आम्ही बालिकांना सन्मान, संधी आणि आशेचे जीवन जगता यावे, यासाठी आमच्या अतूट संकल्पाचा पुनरुच्चार करतो. गेल्या दहा वर्षांत, आम्ही बालिकांचे  चांगले शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे बालिकांना प्रगती करता येत आहे  आणि विकसित भारतासाठी त्या  प्रभावीपणे योगदान देऊ शकतील असे वातावरण सुनिश्चित झाले आहे. ‘’

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From conflict to progress: Remote Irpanar village in Chhattisgarh gets electricity

Media Coverage

From conflict to progress: Remote Irpanar village in Chhattisgarh gets electricity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 एप्रिल 2026
April 27, 2026

Sabka Saath, Sabka Vikas 2.0: PM Modi Delivers Self-Reliance, Global Trade & National Pride