जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इतरांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि पृथ्वीला अधिक सुदृढ बनवण्यासाठी कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींप्रती आपली मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
निरोगी समाज निर्मितीच्या राष्ट्रीय संकल्पाचा पुनरुच्चार करून, मोदी यांनी, आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला महत्त्व देण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकाला स्वतःची शारीरिक सुदृढता राखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केले. याच अनुषंगाने, पंतप्रधानांनी व्यायामाचे महत्त्व विशद करणारे एक संस्कृत सुभाषितही प्रसिद्ध केले.
एक्स या सामाजिक माध्यमावरच्या आपल्या पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणतात,
"जागतिक आरोग्य दिनानिमित्त, आम्ही त्या सर्व लोकांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो, जे इतरांच्या सेवेसाठी अथक परिश्रम घेतात आणि संपूर्ण जग निरोगी राहण्यासाठी कार्य करतात. आम्ही एक सुदृढ समाज घडवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचाही पुनरुच्चार करतो. आरोग्य सेवा प्रणाली बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करत राहूया."
लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः।
विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते॥"
व्यायामामुळे कार्यक्षमता वाढते, पचनशक्ती वाढते, लठ्ठपणा कमी होतो आणि शरीराचे अवयव मजबूत व सुडौल बनू लागतात.
On World Health Day, we express our gratitude to all those who dedicate themselves tirelessly to the service of others and work towards a healthier planet. We also reaffirm our commitment to building a healthier society. Let us all keep working together to strengthen healthcare…
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2026
विश्व स्वास्थ्य दिवस पर मैं सभी देशवासियों के उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं। मेरा आग्रह है कि खुद को स्वस्थ रखने के लिए हरसंभव प्रयास जरूर करें।
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2026
लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः।
विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते॥ pic.twitter.com/EEH6gNbodz


