पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटण्यातील दिनकर गोलांबर येथे राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान म्हणाले की, बिहारचा गौरव असलेले राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या स्फूर्तिदायी रचनांनी नेहमीच नागरिकांना भारतमातेची सेवा करण्यासाठी प्रेरित केले आहे. आज पटना येथे या महान कवीला श्रद्धांजली अर्पण करणे हा एक भाग्यदायी अनुभव आहे,असे त्यांनी नमूद केले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“बिहारचा गौरव असलेले राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या स्फूर्तिदायी रचनांनी नेहमीच नागरिकांना भारतमातेची सेवा करण्यासाठी प्रेरित केले आहे. आज पटना येथे या महान कवीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक भाग्यदायी योग मला लाभला आहे “
बिहार की धरती के गौरव राष्ट्रकवि रामधारी सिंह दिनकर जी की ओजस्वी रचनाओं ने देशवासियों को मां भारती की सेवा के लिए सदैव प्रेरित किया है। आज पटना में दिनकर गोलंबर पर उन्हें श्रद्धांजलि अर्पित करने का सौभाग्य प्राप्त हुआ। pic.twitter.com/vERCOEU5hi
— Narendra Modi (@narendramodi) November 2, 2025


