पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थोर शिक्षणतज्ञ पंडित मदनमोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्पण केली. मोदी यांनी शिक्षण क्षेत्र समृद्ध करण्यात पंडित मालवीय यांच्या संस्मरणीय योगदानाचे यावेळी स्मरण केले.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की,
भारतमातेचे महान सुपुत्र पंडित मदनमोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीदिनी मी विनम्र भावाने श्रद्धांजली अर्पण करतो. देशाचे शिक्षण क्षेत्र समृद्ध करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले होते आणि त्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील.
मां भारती की महान संतान महामना पंडित मदन मोहन मालवीय जी को उनकी जयंती पर विनम्र श्रद्धांजलि। देश के शिक्षा जगत की समृद्धि के लिए उन्होंने अपना जीवन समर्पित कर दिया, जिसके लिए वे सदैव स्मरणीय रहेंगे। pic.twitter.com/ITyTvakDxK
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2022


