पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी स्मरण केले. त्यांची निःस्वार्थ सेवेची भावना देशवासियांना सतत प्रेरणा देत राहील असेही ते म्हणाले.
आपल्या एक्स संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"संपूर्ण क्रांतीचे जनक लोकनायक जयप्रकाश नारायण यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. त्यांनी आयुष्यभर भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची निःस्वार्थ सेवेची भावना देशवासियांना नेहमीच प्रेरणा देईल.
संपूर्ण क्रांति के जनक लोकनायक जयप्रकाश नारायण को उनकी जयंती पर शत-शत नमन। वे जीवनपर्यंत भारतीय लोकतंत्र को सशक्त करने की दिशा में प्रयासरत रहे। उनका निस्वार्थ सेवा भाव देशवासियों को सदैव प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2023


