डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
मोदी म्हणाले की, डॉ. कलाम यांचे एक दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणून स्मरण केले जाते ज्यांनी युवा मनांमध्ये चेतना जागवली आणि देशाला मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली. ते पुढे म्हणाले की, डॉ. कलाम यांचे जीवन आपल्याला नम्रता आणि कठोर परिश्रम यशासाठी आवश्यक असल्याची आठवण करून देते.
पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की आपण डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील मजबूत, आत्मनिर्भर आणि करुणामय भारताची निर्मिती करत राहू.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले;
“डॉ. एपीजे अब्दुल कलाम जी यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करतो . युवा मनांमध्ये चेतना जागवणारे आणि देशाला मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा देणारे दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. त्यांचे जीवन आपल्याला नम्रता आणि कठोर परिश्रम यशासाठी महत्वपूर्ण असल्याची आठवण करून देते.आपण डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील मजबूत, आत्मनिर्भर आणि करुणामय भारताची निर्मिती करत राहूया.”
https://x.com/narendramodi/status/1978291330418622968?s=46


