पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि भारताच्या वैचारिक व विकासात्मक प्रवासातील त्यांच्या महान योगदानाचे स्मरण केले.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे एकात्म मानववाद तत्त्वज्ञान आणि अंत्योदय, म्हणजेच समाजातील शेवटच्या व्यक्तीचे उत्थान. हे भारताच्या विकास प्रारुपासाठी आजही प्रेरणादायी आहे. या मूल्यांचा समावेश सरकारच्या सर्वसमावेशक विकास आणि राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टिकोनात खोलवर झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले की :
"भारत मातेचे महान सुपुत्र आणि एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन. देशाला समृद्धीच्या मार्गावर नेणारे त्यांचे राष्ट्रवादी विचार आणि अंत्योदयाचे तत्त्व विकसित भारताच्या निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत."
भारत माता के महान सपूत और एकात्म मानववाद के प्रणेता पंडित दीनदयाल उपाध्याय जी को उनकी जयंती पर कोटिश: नमन। देश को समृद्धि की राह दिखाने वाले उनके राष्ट्रवादी विचार और अंत्योदय के सिद्धांत विकसित भारत के निर्माण में बहुत काम आने वाले हैं। pic.twitter.com/Lrj39Nn7wP
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2025


