पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा फुले हे मानवतेचे सच्चे सेवक होते अशा शब्दांत त्यांनी महात्मा फुले यांचा गौरव केला आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश : मानवतेचे सच्चे सेवक महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. त्यांनी समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. देशासाठी त्यांनी दिलेले हे अनमोल योगदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
मानवता के सच्चे सेवक महात्मा फुले को उनकी जयंती पर सादर नमन। उन्होंने समाज के शोषित और वंचित वर्गों के कल्याण के लिए अपना जीवन समर्पित कर दिया। देश के लिए उनका अमूल्य योगदान हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा। pic.twitter.com/ENHDuU5bSq
— Narendra Modi (@narendramodi) April 11, 2025






