पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अंत:करणपूर्वक अभिवादन केले.
पंतप्रधानांनी आजही जगभरातील पिढ्यांना प्रेरणा देत असलेल्या सत्य, अहिंसा आणि नैतिक धैर्य या महात्मा गांधींच्या शाश्वत वारशावर प्रकाश टाकला. विकसित आणि सर्वसमावेशक भारताच्या सामूहिक प्रवासात राष्ट्र गांधीजींच्या विचारांना मार्गदर्शक तत्त्वे म्हणून पाळण्याच्या बांधिलकीची त्यांनी पुनरुज्जीवित पुष्टी केली.
सामाजिक संपर्क माध्यम `एक्स` वर पोस्ट केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले :
"गांधी जयंती म्हणजे ज्यांच्या आदर्शांनी मानवी इतिहासाचा प्रवाह बदलून टाकला, त्या आपल्या प्रिय बापूंच्या विलक्षण जीवनाला अभिवादन करण्याचा दिवस आहे. त्यांनी दाखवून दिले की धैर्य आणि साधेपणा ही मोठ्या परिवर्तनाची साधने होऊ शकतात. लोकांचे सबलीकरण करण्याची खरी साधने असलेल्या सेवाभाव आणि करुणा यांच्या शक्तीवर त्यांनी विश्वास ठेवला. विकसित भारताच्या निर्मितीच्या आमच्या प्रयत्नांत आपण त्यांच्या मार्गावर चालत राहू."
Gandhi Jayanti is about paying homage to the extraordinary life of beloved Bapu, whose ideals transformed the course of human history. He demonstrated how courage and simplicity could become instruments of great change. He believed in the power of service and compassion as… pic.twitter.com/LjvtFauWIr
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2025


