पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहिली आणि आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असल्याचा उल्लेख केला. या काळात मूक न राहता संविधानात अंतर्भूत असलेल्या आदर्शांचे रक्षण करणाऱ्या असंख्य नागरिकांचे असामान्य धैर्य आणि चिकाटीही दिसून आली, असे त्यांनी नमूद केले.
घटनात्मक मूल्यांशी असलेली देशाची निष्ठा अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, "संविधान हे 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा, हक्क आणि कर्तव्यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. संविधानाच्या तत्त्वांचे मार्गदर्शन घेत, भारत आपला लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करत राहील आणि न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या आदर्शांशी एकनिष्ठ राहील."
मोदी यांनी लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठीची कटिबद्धता पुन्हा व्यक्त करणारे संस्कृत सुभाषितही सामायिक केले;
"स्वातन्त्र्यात् सुखमाप्नोति स्वातन्त्र्याल्लभते परम्।
स्वातन्त्र्यान्निर्वृत्तिं गच्छेत् स्वातन्त्र्यात् परमं पदम् ।।"
मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट केले:
आज आपण भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहत आहोत.
Today, we pay homage to all those who steadfastly defended democratic values during one of the darkest chapters in India’s history, the Emergency.
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2026
The Emergency was a direct assault on our Constitution. It witnessed the suspension of civil liberties, curbs on freedom of…
आणीबाणी हा आपल्या संविधानावर झालेला थेट हल्ला होता. यामध्ये नागरी स्वातंत्र्याला स्थगिती, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध, राजकीय नेते, पत्रकार, समाजसेवक यांना अटक आणि आपल्या लोकशाहीचा पाया असलेल्या संस्थांवरील हल्ले पाहिले गेले.
त्याच वेळी, शांत राहण्यास नकार देणाऱ्या आणि आपल्या संविधानातील आदर्शांचे रक्षण करणाऱ्या असंख्य नागरिकांचे असामान्य धैर्यही यातून दिसून आले.
आपल्या सर्वांसाठी, आपले संविधान 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा, हक्क आणि कर्तव्यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्याच्या आपल्या सामूहिक वचनबद्धतेचा आपण पुनरुच्चार करतो. आपल्या संविधानाच्या तत्त्वांचे मार्गदर्शन घेत, आपण असा भारत घडवू जो न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाप्रति सदैव वचनबद्ध राहील.
#SamvidhanHatyaDiwas
संविधान हत्या दिवस आज हमें उस काले दौर की याद दिला रहा है, जब भारतीय लोकतंत्र को बुरी तरह से कुचला गया था। यह हमें लोकतंत्र, संविधान और नागरिक अधिकारों की रक्षा के लिए हमेशा प्रतिबद्ध रहने को प्रेरित करता है। आपातकाल का विरोध करने वाली सभी विभूतियों को सादर नमन।
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2026
स्वातन्त्र्यात्… pic.twitter.com/hBr3DzrtsR


