लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठीची वचनबद्धता अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहिली आणि आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असल्याचा उल्लेख  केला. या काळात मूक न राहता संविधानात अंतर्भूत असलेल्या आदर्शांचे रक्षण करणाऱ्या असंख्य नागरिकांचे असामान्य धैर्य आणि चिकाटीही दिसून आली, असे त्यांनी नमूद केले.

घटनात्मक मूल्यांशी असलेली देशाची निष्ठा अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, "संविधान हे 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा, हक्क आणि कर्तव्यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. संविधानाच्या तत्त्वांचे मार्गदर्शन घेत, भारत आपला लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करत राहील आणि न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या आदर्शांशी एकनिष्ठ राहील."

मोदी यांनी लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठीची कटिबद्धता पुन्हा व्यक्त करणारे संस्कृत सुभाषितही सामायिक केले;

"स्वातन्त्र्यात् सुखमाप्नोति स्वातन्त्र्याल्लभते परम्।

स्वातन्त्र्यान्निर्वृत्तिं गच्छेत् स्वातन्त्र्यात् परमं पदम् ।।"

मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट केले:

आज आपण भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहत आहोत.

 

आणीबाणी हा आपल्या संविधानावर झालेला थेट हल्ला होता. यामध्ये नागरी स्वातंत्र्याला स्थगिती, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध, राजकीय नेते, पत्रकार, समाजसेवक यांना अटक आणि आपल्या लोकशाहीचा पाया असलेल्या संस्थांवरील हल्ले पाहिले गेले.

त्याच वेळी, शांत राहण्यास नकार देणाऱ्या आणि आपल्या संविधानातील आदर्शांचे रक्षण करणाऱ्या असंख्य नागरिकांचे असामान्य धैर्यही यातून दिसून आले.

आपल्या सर्वांसाठी, आपले संविधान 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा, हक्क आणि कर्तव्यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्याच्या आपल्या सामूहिक वचनबद्धतेचा आपण पुनरुच्चार करतो. आपल्या संविधानाच्या तत्त्वांचे मार्गदर्शन घेत, आपण असा भारत घडवू जो न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाप्रति सदैव वचनबद्ध राहील.

#SamvidhanHatyaDiwas

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation

Media Coverage

Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारत छोडो आंदोलनात सहभागी शूर स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांकडून आदरांजली
August 09, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मरण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या धैर्य आणि दृढ निश्चयाला आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेने स्वातंत्र्यलढ्यात नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या भारतातील जनतेच्या अढळ संकल्पाचे दर्शन घडवले, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स (X) वर पोस्ट केले:

"ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनातील सर्व सहभागींचे भावपूर्ण स्मरण. त्यांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन दिलेला 'भारत छोडो'चा एल्गार आपल्या स्वातंत्र्यलढ्यात नवीन ऊर्जा भरून गेला आणि वसाहतवादी शासनातून मुक्त होण्याच्या आपल्या लोकांच्या अढळ निश्चयाचे त्याने प्रतीक बनले."