पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेदरलँड्सच्या हेग इथे, भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला उपस्थित होते. ते तिथे पोहोचल्यावर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाने आणि नेदरलँड्समधील भारताच्या मित्रांनी, त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. 

यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना, पंतप्रधानांनी या उत्साही आणि रंगतदार स्वागत समारंभाचे कौतुक केले. डच समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल, तसेच भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील मैत्रीचा एक जिवंत दुवा म्हणून कार्य केल्याबद्दल त्यांनी अनिवासी भारतीयांची प्रशंसा केली. सुरीनामी- हिंदुस्थानी समुदायाच्या भारताशी असलेल्या प्राचीन नातेसंबंधांचेही त्यांनी स्मरण केले. पिढ्यानपिढ्या हे संबंध जतन करत, त्यांचा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. नेदरलँड्समध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय व्यावसायिकांची संख्या मोठी असून, डच विद्यापीठातही, विशेषतः नवोन्मेष प्रणित क्षेत्रात, भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे सांगत, ते दोन देशात आताही भागीदारी वृद्धिंगत करण्यात भर घालत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. क्रिकेट आणि हॉकी सारख्या खेळांसह, इतर क्रीडाक्षेत्रात दोन्ही देशात नवे चैतन्य आणि लोकांचा परस्पर संबंध वाढतो आहे, हे ही त्यांनी अधोरेखित केले. 

भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य सातत्याने विस्तारत असून, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष ही त्यातील प्रमुख लक्षवेधी क्षेत्रे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.

दोन्ही देशांमधील मजबूत आणि वाढत्या व्यापार आणि  आर्थिक संबंधांवर त्यांनी भर दिला. नेदरलँड्स हा युरोपमधील भारताच्या सर्वात मोठ्या निर्यात देशांपैकी एक असून, भारतातील प्रमुख गुंतवणूक भागीदारांपैकीही एक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, भारत-युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही बाजूंना नव्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले. 

2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने भारतात होत असलेला विकास आणि वाढ, याची पंतप्राधानांनी माहिती दिली.  पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, स्वच्छ ऊर्जा आणि डिजिटल प्रणाली यांसह विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या व्यापक प्रगतीमुळे भारतात सुरू असलेल्या परिवर्तनाचा व्यापक आवाका आणि वेग त्यांनी अधोरेखित केला.

भारत आत्मविश्वासाने स्वतःचे भविष्य घडवत असून, त्याचवेळी जागतिक विकास आणि समृद्धीतही महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताबाहेर राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागारिकाच्या पाठीशी भारत सरकार ठामपणे उभे असून त्यांच्या कल्याणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नेदरलँड्समधल्या आपल्या अनुभवांचा उपयोग करत, विकसित भारताच्या उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.                    

सुरिनामी-हिंदुस्थानी अनिवासी  भारतीयांसाठी ओ सी आय  पात्रतेचे निकष शिथिल  करण्यात आले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यानुसार, त्यांच्यासाठी ओसीआय  कार्ड पात्रता चौथ्या पिढीपासून वाढवून सहाव्या पिढीपर्यंत करण्यात आली आहे.

पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण येथे पाहता येईल: [Link].

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
West Asia conflict: 59 India-bound vessels transited Hormuz since war

Media Coverage

West Asia conflict: 59 India-bound vessels transited Hormuz since war
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 जुलै 2026
July 22, 2026

From Scholarships to Homes to High-Speed Rail: Inclusive Growth Under PM Modi’s Leadership