आयुष्मान भारतला आज सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, या योजनेच्या परिणामांचा मागोवा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारतने लाखो नागरिकांना परवडणारी, आर्थिक संरक्षण आणि सन्मानासह आरोग्यसेवा मिळेल हे सुनिश्चित करून दर्जेदार आरोग्यसेवेची नवी व्याख्या केली असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
यासंदर्भात MyGovIndia च्या एक्स समाजमाध्यमावरील पोस्टवर प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणतात:
"आज आपण #7YearsOfAyushmanBharat साजरी करत आहोत! हा असा उपक्रम होता ज्यामध्ये भविष्यातील संभाव्य गरजा लक्षात घेऊन उच्च दर्जाची त्याच बरोबर परवडणारी खात्रीशीर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याबद्दल या योजनेचे आभार मानले पाहिजेत, भारतात सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये क्रांती होत असल्याचे दिसत आहे. यामुळे आर्थिक संरक्षण आणि प्रतिष्ठा सुनिश्चित झाली आहे. मानव सशक्तीकरणाचे ध्येय प्रमाण, सहृदयता आणि तंत्रज्ञान या गोष्टींच्या मदतीने पुढे नेता येऊ शकते," हे भारताने दाखवून दिले आहे.
Today we mark #7YearsOfAyushmanBharat! This was an initiative that anticipated the needs of the future and focussed on ensuring top quality as well as affordable healthcare for people. Thanks to it, India is witnessing a revolution in public healthcare. It has ensured financial… https://t.co/ys5oc9QnXf
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2025


