स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत तीन गिनीज जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. या कामगिरीची माहिती देणाऱ्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एका पोस्टवर आपला अभिप्राय देताना पंतप्रधान म्हणाले, अशा प्रकारचे उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत. अशा प्रकारच्या लोकचळवळी महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना अधिक चालना देतात आणि नारी शक्तीच्या जीवनावर परिवर्तनकारी प्रभाव निर्माण करतात, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केलेः
“ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे! अशा प्रकारच्या लोकचळवळी महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना अधिक चालना देतात आणि आपल्या नारी शक्तीच्या जीवनावर परिवर्तनकारी प्रभाव निर्माण करतात.”
This is very commendable! Such mass movements add impetus to our women empowerment efforts and have a transformative impact on the lives of our Nari Shakti. https://t.co/Hb2rSSOIXv
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2025


