पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये एमएसएमई अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगाद्वारे 1 लाख रोजगार निर्मितीची प्रशंसा केली आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
" उत्तम कामगिरी , मणिपूर ! राज्याची प्रगती वृद्धींगत करण्यासाठी एमएसएमई क्षेत्राच्या सामर्थ्याचा लाभ घेण्याचे उत्तम कार्य असेच जारी ठेवा . " "
Well done Manipur! Keep up the good work of leveraging the strength of the MSME sector in order to further the state’s progress. https://t.co/qHYAygCQ2c
— Narendra Modi (@narendramodi) October 30, 2021


