पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरा कुमार दिसानायके हे दोन्ही नेते आज अनुराधापुरा इथे भारताच्या सहकार्याने बांधलेल्या दोन रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि शुभारंभ समारंभात सहभागी झाले होते.

 

यावेळी दोन्ही नेत्यांनी 91.27 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्चाच्या, आणि भारताच्या सहकार्याने नूतनीकरण केलेल्या 128 किलो मीटर लांबीच्या माहो-ओमंथाई रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी 14.89 अमेरिकन डॉलर खर्चाच्या आणि भारताकडून मिळालेल्या अनुदानाच्या मदतीने बांधल्या जात असलेल्या माहो ते अनुराधापुरा पर्यंतच्या प्रगत सिग्नल यंत्रणेच्या बांधकामाचेही उद्घाटन केले.

 

हे ऐतिहासिक रेल्वे आधुनिकीकरण प्रकल्प भारत - श्रीलंका विकास भागीदारीअंतर्गत राबवले गेले आहेत. हे प्रकल्प श्रीलंकेच्या उत्तर-दक्षिण भागातली रेल्वे जोडणी मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मैलाचा टप्पा ठरले आहे.  या प्रकल्पांमुळे श्रीलंकेतील प्रवासी तसेच मालवाहतूक जलद आणि कार्यक्षम व्हायला मदत होणार आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
ET@Davos 2026: ‘India has already arrived, no longer an emerging market,’ says Blackstone CEO Schwarzman

Media Coverage

ET@Davos 2026: ‘India has already arrived, no longer an emerging market,’ says Blackstone CEO Schwarzman
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 जानेवारी 2026
January 23, 2026

Viksit Bharat Rising: Global Deals, Infra Boom, and Reforms Propel India to Upper Middle Income Club by 2030 Under PM Modi