युक्रेनमधील संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणाच्या दृष्टीने अलिकडच्या घडामोडींवर नेत्यांनी केली विचारांची देवाणघेवाण
दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यातील सकारात्मक घडामोडींचे केले स्वागत
एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे भारतात स्वागत करण्यास पंतप्रधान उत्सुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

दोन्ही नेत्यांनी आर्थिक, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्यातील विकासाचा आढावा घेतला आणि त्याचे सकारात्मक मूल्यांकन केले. होरायझन 2047 पथदर्थक, हिंद-प्रशांत पथदर्थक आणि संरक्षण औद्योगिक पथदर्थकाच्या अनुषंगाने भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टीही नेत्यांनी केली.

युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी अलिकडच्या काळात झालेल्या प्रयत्नांवर त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली. पंतप्रधान मोदींनी संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण तसेच शांतता आणि स्थैर्य लवकर पुनर्संचयित करण्यासाठी भारताच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.

फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने आयोजित केलेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले आणि त्यांचे भारतात स्वागत करण्यास आपण उत्सुक असल्याचे सांगितले.

दोन्ही नेत्यांनी जागतिक शांतता आणि स्थैर्य वाढविण्यासाठी संपर्कात राहण्याचे आणि निकटतेने काम करण्याचे मान्य केले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s power sector set for strong FY27 growth on rising demand, capacity additions: Report

Media Coverage

India’s power sector set for strong FY27 growth on rising demand, capacity additions: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 जुलै 2026
July 20, 2026

Yuva to Global Stage: How PM Modi’s Policies Are Turning India’s Youth, Farms & Factories into Growth Engines