बीआरओ अर्थात सीमा रस्ते संघटनेने पूर्ण करून आज राष्ट्रार्पण केलेल्या ९० पायाभूत सुविधा प्रकल्पांची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. देशभरातील ११ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये उभारलेल्या या प्रकल्पांवर सुमारे २,९०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हे ९० प्रकल्प आज राष्ट्राला समर्पित केले.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले , “या महत्वाच्या प्रकल्पांमुळे सीमावर्ती भागांत पायाभूत सुविधांची परिस्थिती सुधारण्यात मोठे योगदान मिळेल.”
These are important projects which will go a long way in enhancing infrastructure in the border areas! https://t.co/3Q3AoiRuRO
— Narendra Modi (@narendramodi) September 12, 2023


