पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी त्यांनी समृद्धी, आरोग्य व 'विकसित भारत'चा संकल्प पूर्ण व्हावा, अशी प्रार्थना केली.
नवरात्रीच्या पवित्र उत्सवाचा प्रारंभ होत असताना, पंतप्रधानांनी देवी शैलपुत्रीच्या दिव्य आणि परोपकारी कृपेचे महत्त्व सांगणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. पंतप्रधान मोदींनी या प्रसंगी देवीला समर्पित एक भक्तीपर स्तोत्रदेखील सामायिक केले आणि नमूद केले की, देवीच्या असीम कृपेने सर्व नागरिकांचे कल्याण होईल व विकसित भारताच्या सामूहिक संकल्पाला एक मोठी गती मिळेल.
पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या पोस्ट्सच्या एका मालिकेमध्ये लिहिले:
"देशभरातील माझ्या सर्व कुटुंबियांना नवरात्रीच्या हार्दिक मंगलकामना. शक्तीच्या उपासनेचा हा दिव्य प्रसंग तुम्हा सर्वांसाठी सुख, सौभाग्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. शक्तिस्वरूपा आई दुर्गेच्या असीम कृपेने सर्वांचे कल्याण होवो, ज्यामुळे विकसित भारताच्या आपल्या संकल्पालाही नवीन ऊर्जा मिळेल. जय अंबे जगदंबे मा! "
"नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई दुर्गेचे पहिले स्वरूप देवी शैलपुत्रीच्या पूजेची परंपरा आहे. त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात संयम, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हावा, हीच कामना आहे.
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥"
मी देवी शैलपुत्रीला वंदन करतो, जी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते, जिच्या कपाळावर चंद्रकोर विराजमान आहे, जी बैलावर आरूढ आहे आणि जिच्या हातात त्रिशूळ आहे. ती एक तेजस्वी आणि वंदनीय देवी आहे.
"जगज्जननी आई दुर्गेच्या चरणी कोटी-कोटी देशवासियांच्या वतीने माझे नमन आणि वंदन! नवरात्रीच्या पावन पर्वावर देवी मातेकडे विनंती आहे की तिने प्रत्येकाला आपल्या स्नेहाचा आणि अनुकंपेचा आशीर्वाद द्यावा. जय माता दी!"
देशभर के मेरे परिवारजनों को नवरात्रि की हार्दिक मंगलकामनाएं। शक्ति की आराधना का यह दिव्य अवसर आप सभी के लिए सुख, सौभाग्य, समृद्धि और उत्तम स्वास्थ्य लेकर आए। शक्तिस्वरूपा मां दुर्गा की असीम कृपा से सबका कल्याण हो, जिससे विकसित भारत के हमारे संकल्प को भी नई ऊर्जा मिले। जय अंबे…
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2026
नवरात्रि के पहले दिन मां दुर्गा के प्रथम स्वरूप देवी शैलपुत्री की पूजा का विधान है। उनके आशीर्वाद से हर किसी के जीवन में संयम, शांति और सकारात्मक ऊर्जा का संचार हो, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2026
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥ pic.twitter.com/jhjMB7SPY9
जगतजननी मां दुर्गा के चरणों में कोटि-कोटि देशवासियों की ओर से मेरा नमन और वंदन! नवरात्रि के पावन पर्व पर देवी मां से विनती है कि वे हर किसी को अपने स्नेह और अनुकंपा का आशीर्वाद प्रदान करें। जय माता दी! https://t.co/WHEzTr3Xv6
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2026


