खोल समुद्रात सध्या प्रवास करत असलेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यच्या पथकाकडून प्राप्त झालेल्या छायाचित्राबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. देश 2026 या नववर्षाचे स्वागत करण्यास सज्ज होत असताना पंतप्रधानांनी पथकाच्या उत्साहाची प्रशंसा करत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
एक्स या सामाजिक माध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
"आयएनएसव्ही कौंडिण्यच्या पथकाकडून हे छायाचित्र प्राप्त झाल्याने आनंद झाला. त्यांच्या उत्साह प्रेरणादायी आहे. देश 2026 या नववर्षाचे स्वागत करण्यास सज्ज होत असताना खोल समुद्रात सध्या प्रवास करत असलेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यच्या पथकाला माझ्या विशेष शुभेच्छा. त्यांचा उर्वरित प्रवासही आनंददायी आणि यशस्वी ठरो, अशी सदिच्छा व्यक्त करतो.
@INSVKaundinya”
Delighted to receive this picture from the team of INSV Kaundinya! Heartening to see their enthusiasm. As we are all set to usher in 2026, my special greetings to the INSV Kaundinya team, which is on the high seas. May the rest of their journey also be full of joy and success.… pic.twitter.com/pYnAPHCG7h
— Narendra Modi (@narendramodi) December 31, 2025


