पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. श्री. मोदी यांनी आपल्या शास्त्रज्ञांप्रती अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त केली तसेच 1998 मधील पोखरण चाचणीची आठवण करून दिली आहे. त्यांनी विज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून भावी पिढ्यांना सक्षम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार देखील केला आहे.

‘एक्स’ या सामाजिक संपर्क माध्यमा वरील आपल्या संदेशामध्ये पंतप्रधानांनी लिहिले:

"राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! हा दिवस आपल्या शास्त्रज्ञांविषयी अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आणि 1998 मधील पोखरण चाचणी आठवण्याचा आहे. त्या घटना आपल्या देशाच्या विकासप्रवासात प्रामुख्याने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मैलाचा दगड ठरल्या आहेत.

आपल्या नागरिकांच्या सामर्थ्यावर आधारित भारत आज तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये—अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल नवकल्पना, हरित तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये—जगात अग्रगण्य बनत आहे. विज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून भावी पिढ्यांना सक्षम करण्याचा आपला संकल्प आपण पुन्हा दृढ करत आहोत. तंत्रज्ञान मानवतेचा विकास करो, आपल्या देशाची सुरक्षा करो आणि भविष्यातील प्रगतीस चालना देवो."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways takes up 764 km of new lines to boost connectivity in Bihar’s Seemanchal region

Media Coverage

Indian Railways takes up 764 km of new lines to boost connectivity in Bihar’s Seemanchal region
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 07 ऑगस्ट 2026
August 07, 2026

Viksit Bharat Accelerating: 4x Data Centres, Record EV Sales, Ethanol Validation & Northeast Connectivity Under PM Modi’s Watch