पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशाच्या स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
गौरवशाली इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेला मध्य प्रदेश आपल्या जनतेच्या आकांक्षा अग्रस्थानी ठेवून आज प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे, असं पंतप्रधान म्हणाले. मध्य प्रदेशातील लोकांचे कौशल्य आणि परिश्रम विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेत महत्वपुर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की;
गौरवशाली इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मध्य प्रदेशातील माझ्या सर्व बांधवांना राज्य स्थापना दिनाच्या अनेक शुभेच्छा. देशाच्या हृदयात वसलेले हे आपले राज्य जनतेच्या आकांक्षा पुढे ठेवून आज प्रत्येक क्षेत्रात वेगवान प्रगती करत आहे. मला विश्वास आहे की, विकसित भारताच्या संकल्पाची पूर्तता करण्यात येथील सुज्ञ आणि परिश्रमी लोकांची अमूल्य भूमिका असणार आहे.
गौरवशाली इतिहास और सांस्कृतिक धरोहर को संजोने वाले मध्य प्रदेश के अपने सभी परिवारजनों को राज्य के स्थापना दिवस की ढेरों शुभकामनाएं। देश के हृदय में बसा हमारा यह प्रदेश जन-जन की आकांक्षाओं को आगे रखकर आज हर क्षेत्र में प्रगति की नई रफ्तार भर रहा है। मुझे विश्वास है कि विकसित भारत…
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2025


