पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पालघर येथे निवासी इमारत कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला असून काहीजण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स हँडलवरच्या संदेशात म्हटले आहे :
“महाराष्ट्रातील पालघर येथे इमारत कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेने अत्यंत दु:ख झाले. या कठीण काळात आपले प्रियजन गमावलेल्यांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. प्रशासनाकडून बाधितांना शक्य ती सर्व मदत पुरविली जात आहे : पंतप्रधान @narendramodi”
Deeply saddened by the mishap due to the collapse of a building in Palghar, Maharashtra. My thoughts are with the affected people and their families in this difficult hour. Praying for the speedy recovery of the injured. Authorities are providing all possible assistance to those…
— PMO India (@PMOIndia) August 28, 2025


