पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरकाशीतील धारली येथील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे. या आपत्तीमुळे प्रभावित झालेल्यांच्या कल्याणासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधानांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
गरजूंना वेळेवर मदत मिळावी यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
पंतप्रधानांनी X वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे:
'उत्तरकाशीतील धारली येथील नैसर्गिक अपत्तीमुळे बाधित झालेल्यांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच सर्व पीडितांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी बोलून मी परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकारच्या देखरेखीखाली मदत आणि बचाव पथके सर्वतोपरी सहाय्य करत आहेत. लोकांना वेळेवर मदत पुरवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही.
@pushkardhami”
उत्तरकाशी के धराली में हुई इस त्रासदी से प्रभावित लोगों के प्रति मैं अपनी संवेदना व्यक्त करता हूं। इसके साथ ही सभी पीड़ितों की कुशलता की कामना करता हूं। मुख्यमंत्री पुष्कर धामी जी से बात कर मैंने हालात की जानकारी ली है। राज्य सरकार की निगरानी में राहत और बचाव की टीमें हरसंभव…
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2025


