पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.ही योजना भारतातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी समर्पित असलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. आतापर्यंत सुमारे 3.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“पीएम-किसान योजनेला 6 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील आमच्या शेतकरी बंधु भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन माझ्यासाठी ही अत्यंत समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे की आतापर्यंत सुमारे 3.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. आमचे हे प्रयत्न अन्नदात्यांना सन्मान , समृद्धी आणि नवे सामर्थ्य देत आहेत #PMKisan”
पीएम-किसान योजनेला 6 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील आमच्या शेतकरी बंधु भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन माझ्यासाठी ही अत्यंत समाधानाची आणि अभिमानाची आहे, आतापर्यंत सुमारे 3.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. आमचे हे प्रयत्न अन्नदात्यांना सन्मान , समृद्धी आणि नवे सामर्थ्य देत आहेत
पीएम-किसान के 6 वर्ष पूरे होने पर देशभर के हमारे किसान भाई-बहनों को बहुत-बहुत बधाई। मेरे लिए अत्यंत संतोष और गर्व का विषय है कि अब तक करीब साढ़े तीन लाख करोड़ रुपये उनके खाते में पहुंच चुके हैं। हमारा ये प्रयास अन्नदाताओं को सम्मान, समृद्धि और नई ताकत दे रहा है। #PMKisan
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2025


