पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमपूज्य पोप लिओ चौदावे (XIV) यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांना भारतीय जनतेच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत. पोप यांच्या कॅथोलिक चर्चच्या नेतृत्वाची मोदी यांनी प्रशंसा केली असून, जागतिक शांतता, सौहार्द, एकात्मता आणि सेवेचा प्रसार करण्यामधील त्यांच्या नेतृत्वाचे मोलाचे महत्व अधोरेखित केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे:
“पोप लिओ XIV (चौदावे) यांचे मी भारतीय जनतेच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. शांतता, सौहार्द, एकात्मता आणि सेवेचा आदर्श पुढे नेण्यासाठी महत्वाच्या असलेल्या टप्प्यावर ते कॅथलिक चर्चचे नेतृत्व करत आहेत. आमची सामायिक मूल्ये पुढे नेण्यासाठी पवित्र पोप यांच्याशी सातत्त्याने संवाद आणि संबंध ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. @Pontifex”
I convey sincere felicitations and best wishes from the people of India to His Holiness Pope Leo XIV. His leadership of the Catholic Church comes at a moment of profound significance in advancing the ideals of peace, harmony, solidarity and service. India remains committed to…
— Narendra Modi (@narendramodi) May 9, 2025


