पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायदळ दिनानिमित्त भारतीय लष्कराच्या सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय सैन्य दलाच्या सार्वजनिक माहिती विभागाचे अतिरिक्त महासंचालक यांची, X वर पोस्ट सामाईक करताना पंतप्रधान म्हणाले:
“भारतीय लष्कराच्या सर्व जवानांना पायदळ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या पायदळाच्या अथक धैर्याचा आणि दृढतेचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. त्यांचा प्रत्येक प्रयत्न आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वभौमत्वासाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेचे दर्शन घडवतो. त्यांची अथक जागरुकता आणि अतुलनीय शौर्य काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहे.”
Best wishes to all personnel of the Indian Army on Infantry Day. This is a day to honour the relentless courage and tenacity of our infantry. Every effort of theirs echoes their commitment to our nation's safety and sovereignty. Their tireless vigil and unmatched valour have… https://t.co/yuHxDJrvGb
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2023


