पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी खासदार क्रीडा स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे आणि सहभागींचे हार्दिक अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
युवा सहभागींनी दाखवलेली ऊर्जा आणि उत्साह खरोखरच उल्लेखनीय असल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी आपल्या कामगिरीद्वारे अपवादात्मक क्षमता आणि कौशल्य प्रदर्शित केले असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले;
"काशी खासदार क्रीडा स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे आणि सहभागींचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. यात भाग घेणाऱ्या युवा मित्रांचा जो जोश आणि उत्साह पहायला मिळाला तो अद्भुत होता. त्यांनी आपली क्षमता आणि कौशल्याचे शानदार प्रदर्शन केले."
काशी सांसद खेलकूद प्रतियोगिता के सभी विजेताओं और प्रतिभागियों को मेरी बहुत-बहुत बधाई और शुभकामनाएं! इसमें हिस्सा लेने वाले युवा साथियों का जो जोश और उत्साह देखने को मिला, वो अद्भुत था। उन्होंने अपनी क्षमता और कौशल का शानदार प्रदर्शन किया। pic.twitter.com/g8b5tExslF
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2025


