पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नागरी सेवा परीक्षा  2025 यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले  की त्यांच्या समर्पण, चिकाटी आणि कठोर परिश्रमामुळे त्यांना हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे.

नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे ही सार्वजनिक सेवेच्या एका महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले . त्यांनी यशस्वी उमेदवारांना देशाची सेवा करण्याच्या आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

परीक्षेत अपेक्षित यश  न मिळालेल्यांनाही पंतप्रधानांनी संदेश दिला. असे क्षण कठीण असू शकतात, मात्र एका लांबच्या  प्रवासातील हे केवळ एक पाऊल आहे यावर त्यांनी भर दिला.

आगामी परीक्षांसाठी आणि देशासाठी व्यक्ती योगदान देऊ शकतील अशा अनेक प्रसंगांमध्ये अमाप संधी उपलब्ध आहेत हे अधोरेखित करून, पंतप्रधानांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;

“नागरी सेवा परीक्षा,2025 यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन. त्यांच्या समर्पण,चिकाटी आणि कठोर परिश्रमामुळे हा महत्त्वाचा टप्पा त्यांनी गाठला आहे.

देशाची सेवा करण्याच्या आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या प्रवासाला निघालेल्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.”

 

 

“To those who may not have secured the desired outcome in the Civil Services Examination, I understand that such moments can be difficult. However, this is only one step in a larger journey. Many opportunities lie ahead, both in future examinations and in the many avenues through which you can contribute to our nation. My best wishes for the road ahead.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending

Media Coverage

Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026