पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रेडरिक मर्झ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि जर्मनीच्या संघराज्याच्या चॅन्सेलरपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
गेल्या 25 वर्षांत भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीतील उत्कृष्ट प्रगती लक्षात घेऊन, दोन्ही नेत्यांनी व्यापार व गुंतवणूक, संरक्षण व सुरक्षा, नवोन्मेष व तंत्रज्ञान या क्षेत्रांसह द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी निकट सहकार्य करण्याचे मान्य केले. जर्मनीमध्ये भारतीय समुदायाने दिलेल्या सकारात्मक योगदानाची दखल दोन्ही नेत्यांनी घेतली.
त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक तसेच जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी नेत्यांनी त्यांच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी चॅन्सेलर मर्झ यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले.नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले.
Spoke to Chancellor @_FriedrichMerz and congratulated him on assuming office. Reaffirmed our commitment to further strengthen the Strategic Partnership between India and Germany. Exchanged views on regional and global developments. We stand united in the fight against terrorism.
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2025


