भारतीय तिरंदाजी संघाने आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.
या संघाने अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवत, 6 सुवर्ण पदकांसह एकूण 10 पदके जिंकल्याचे त्यांनी म्हटले आहे. तब्बल 18 वर्षांनंतर भारताने पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. वैयक्तिक स्पर्धांमध्ये केलेल्या दमदार कामगिरीबद्दल तसेच कंपाऊंड प्रकारात विजेतेपद राखल्याबद्दलही पंतप्रधानांनी संघाचे कौतुक केले आहे.
या संघाचे हे उल्लेखनीय यश देशभरातील अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देईल असे त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात X या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी सामायिक केलेला संदेश :
आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये आजवरची सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल आपल्या तिरंदाजी संघाचे अभिनंदन. त्यांनी 6 सुवर्ण पदकांसह एकूण 10 पदके आपल्या देशासाठी आणली. यापैकी, 18 वर्षांनंतर मिळवलेले पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारातील ऐतिहासिक सुवर्णपदक विशेष दखलपात्र आहे. त्याचबरोबर, वैयक्तिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी झाली आणि कंपाऊंडमधील विजेतेपदही यशस्वीरित्या राखण्यात आले. ही खरोखरच एक खूप विशेष कामगिरी आहे, यामुळे अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.
Congratulations to our Archery team on their best ever performance at the Asian Archery Championships 2025. They have brought home 10 medals, including 6 Golds. Notable among these was the historic Recurve Men's Gold after 18 years. At the same time, there were strong showings in… pic.twitter.com/7fQyisyroJ
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2025


