उज्ज्वला कुटुंबात सामील झालेल्या सर्व माता आणि भगिनींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. "आम्ही उचललेल्या या पावलांमुळे, त्यांना या पवित्र सणाचा नवा आनंद तर घेता येईलच, त्याव्यतिरिक्त महिला सक्षमीकरणाप्रति आमच्या वचनबद्धतेलाही अधिक बळ मिळेल", असे मोदी म्हणाले.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या ट्विटला प्रतिसाद देत मोदी म्हणाले:
"नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, उज्ज्वला कुटुंबात सामील होणाऱ्या आमच्या सर्व माता आणि भगिनींचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! आमच्या या निर्णयामुळे या पवित्र सणाचा त्यांना केवळ नवीन आनंद घेता येईल एवढेच नाही तर महिला सक्षमीकरणाचा आमच्या संकल्पालाही अधिक बळ मिळेल.
नवरात्रि के शुभ अवसर पर उज्ज्वला परिवार से जुड़ने वाली हमारी सभी माताओं-बहनों को बहुत-बहुत बधाई एवं शुभकामनाएं! हमारे इस कदम से ना सिर्फ इस पावन पर्व पर उन्हें नई खुशी मिलेगी, बल्कि नारी सशक्तिकरण के हमारे संकल्पों को भी और मजबूती मिलने वाली है। https://t.co/jYWve2SbrU
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2025


