त्यांचा असामान्य सांगीतिक प्रवास आणि अजरामर प्रतिभा पंतप्रधानांकडून अधोरेखित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. भारताने आजवर अनुभवलेल्या अत्यंत दिग्गज आणि अष्टपैलू गायकांपैकी त्या एक होत्या, अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला. अनेक दशकांचा प्रदीर्घ काळ व्यापलेल्या त्यांच्या असामान्य सांगीतिक प्रवासाने देशाचा सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आणि जगभरातील अगणित लोकांच्या हृदयाला स्पर्श केला, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांचे भावस्पर्शी सुरावटींचे गाणे असो वा चैतन्यमयी रचना, त्यांच्या आवाजात एक अजरामर प्रतिभा होती, असे सांगत मोदी यांनी त्यांच्यासोबत झालेल्या संवादाच्या आठवणींना उजाळा दिला.
पंतप्रधानांनी आशाजींच्या कुटुंबियांप्रती, त्यांच्या चाहत्यांप्रती आणि संगीतप्रेमींप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. त्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या जीवनात सदैव गुंजत राहतील, असेही ते म्हणाले.
एक्स या सामाजिक माध्यमांवरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
भारतातील सर्वात ख्यातनाम  आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे. अनेक दशकांचा त्यांचा हा असामान्य प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाची समृद्धी वाढवणारा आणि जगभरातील अगणित लोकांच्या हृदयाला भिडणारा ठरला. त्यांचे भावपूर्ण सुरावटींचे गायन असो वा चैतन्यमयी रचना, त्यांच्या आवाजात एक अजरामर प्रतिभा होती. त्यांच्यासोबत झालेला संवाद  सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या आणि संगीतप्रेमींच्या दुःखात मी सहभागी आहे. त्या पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या मनात कायमचे घर करून राहतील.

 

“भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Auckland's Sky Tower lights up in India's tricolour as PM Modi begins historic New Zealand visit

Media Coverage

Auckland's Sky Tower lights up in India's tricolour as PM Modi begins historic New Zealand visit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 जुलै 2026
July 11, 2026

Record Exports, Record Investments, Record Pride: India’s Rise Under PM Modi is Multi-Dimensional