नायक (निवृत्त) भैरों सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;
"नायक (निवृत्त) भैरों सिंहजी यांनी देशाची जी सेवा केली आहे त्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील.आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या वेळी त्यांनी मोठे धैर्य दाखवले. त्यांच्या निधनाबद्दल मला तीव्र दुःख झाले आहे. या दुःखद प्रसंगात त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शोक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.
Naik (Retd) Bhairon Singh Ji will be remembered for his service to our nation. He showed great courage at a crucial point in our nation's history. Saddened by his passing away. My thoughts are with his family in this hour of sadness. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) December 19, 2022


