श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या श्रीलंकेच्या लोकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सर्व बाधित कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी आणि लवकरात लवकर प्रकृती ठीक होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
भारताचा सागरी क्षेत्रातील अत्यंत जवळचा शेजारी असलेल्या श्रीलंकेप्रती दृढ ऐक्याची भावना प्रकट करत भारत सरकारने ऑपरेशन सागर बंधू मोहिमेअंतर्गत बचाव साहित्य आणि मानवतावादी सहाय्य तसेच आपत्ती निवारण सहाय्य तातडीने रवाना केले आहे. तसेच परिस्थितीचा अंदाज घेऊन श्रीलंकेला अतिरिक्त सहाय्य आणि मदत पाठवण्यासाठी भारत सज्ज आहे.
शेजारी प्रथम या भारताच्या तत्त्वाला अनुसरून आणि महासागर दृष्टिकोनानुसार, श्रीलंकेच्या बिकट काळात भारत नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभा राहील, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला आहे.
एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:
दितवाह चक्रीवादळात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्या श्रीलंकेतील लोकांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. मी सर्व बाधित कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रकृती ठीक होण्यासाठी प्रार्थना करतो.
भारताचा सागरी क्षेत्रातील अत्यंत जवळच्या शेजारी राष्ट्राप्रति दृढ ऐक्याची भावना दर्शवण्यासाठी भारताने ऑपरेशन सागर बंधू मोहिमेअंतर्गत बचाव साहित्य आणि मानवतावादी सहाय्य तसेच आपत्ती निवारण सहाय्य तातडीने रवाना केले आहे. बदलत्या परिस्थितीनुसार अधिक मदत आणि सहाय्य पुरवण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत.”
शेजारी प्रथम या भारताच्या तत्त्वाला अनुसरून आणि महासागर दृष्टिकोनानुसार, श्रीलंकेच्या बिकट काळात भारत नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभा राहील.
@anuradisanayake”
My heartfelt condolences to the people of Sri Lanka who have lost their loved ones due to Cyclone Ditwah. I pray for the safety, comfort and swift recovery of all affected families.
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2025
In solidarity with our closest maritime neighbour, India has urgently dispatched relief…


